पीसीईटीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर लांडगे आणि सचिव पदावर विठ्ठल काळभोर यांची निवड

रोहित खर्गे
विभागीय संपादक

रिक्त झालेल्या विश्वस्त पदावर गोरख भालेकर यांची निवड

पिंपरी दि. २६ फेब्रुवारी २०२१
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट या पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावर माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे आणि सचिव पदावर प्रसिध्द उद्योजक विठ्ठल काळभोर यांची निवड झाली आहे. तसेच उपाध्यक्ष पदावर पद्माताई भोसले, खजिनदार पदावर शांताराम गराडे, विश्वस्त पदावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक गोरख भालेकर यांची निवड झाली आहे. ही निवड पुढील पाच वर्षासाठी झाली असल्याची माहिती संस्थेचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
कर्मयोगी माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांनी 1990 साली पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) ची स्थापना केली. तीस वर्षात या संस्थेने शिक्षण क्षेत्रात स्वत:च्या स्वतंत्र ठसा उमटवला आहे. सध्या पीसीईटीचे आकुर्डी आणि रावेत येथे प्रशस्त व अत्याधुनिक सुख, सुविधांनी संपन्न कॅम्पस आहे. येथे केजी टू पीएचडी पर्यंतचे विविध शाखांचे शिक्षण उपलब्ध आहे. सध्या संस्थेच्या आठ शैक्षणिक शाखा आहेत. यामध्ये पीसीसीओई (आकुर्डी), पीसीओई ॲण्ड आर (रावेत), पीसीबी, एसबीपीआयएम, एसबीपीसीओएडी, एसबी पाटील ज्युनियर कॉलेज, एसबी पाटील पब्लिक स्कूल, पुणे बीजनेस स्कूल अशा आठ शाखा तर दहा हजारांहून जास्त विद्यार्थी आणि एक हजारांहून जास्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आहे. एस.बी.पाटील स्कूलला ब्रिटीश कौन्सिलची मान्यता आहे. पीसीसीओई या अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘नॅक’ ची मान्यता आणि ‘एनबीए’ नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिएशन ची मान्यता आहे. एसबीपीआयएम या व्यवस्थापन महाविद्यालयाला देखील ‘नॅक’ची मान्यता आहे. तसेच एसबीपीसीओएडी या आर्किटेक्चर महाविद्यालयाला ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ ची मान्यता आहे.
पीसीसीओई ॲण्ड आर या महाविद्यालयाने सात वर्षात पेटंट नोंदणीचे तीन विश्व विक्रम केले आहेत.
पीसीसीओईचा एनआयआरएस रँकींग मध्ये भारतातून पहिल्या दोनशे मध्ये आहे. मागील तीन वर्षापुर्वी पीसीईटी संस्थेने लोकमान्य बाळ गंगाधार टिळक यांनी स्थापन केलेल्या तळेगाव येथिल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या संस्थेबरोबर शैक्षणिक व प्रशासकीय सहाय्यासाठी सामंजस्य करार केला आहे. त्या अंतर्गत पीसीईटीचे व्यवस्थापन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाला शैक्षणिक व प्रशासकीय सहाय्य करीत आहे.
पीसीईटीच्या ‘ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेल’ मधून आतापर्यंत तेविस हजारांहून जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून दिला आहे. तसेच देशभरातून बारा लाखांहून जास्त विद्यार्थ्यांनी विविध ऑफ कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हमध्ये नोंदणी केली आहे अशी माहिती पीसीईटी संस्थेच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *