पुणे प्रतिनीधी
कोरोना काळामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना शाबासकीची एक थाप म्हणून सोनम पाटील यांच्या AION event and hospitality या संस्थेच्या वतीने मी पुणेरी कोरोनवर भारी,,walk for cause का कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे यांना उत्तुंग भरारी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले…
29 डिसेंबर रोजी आण्णा भाऊ साठे सभागृह पुणे याठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते…
या कार्यक्रमात उतुंग भरारी पुरस्कार , कोरोना योद्धा पुरस्कार आणि नवदुर्गा पुरस्कार या तीन प्रकारातील पुरस्कार या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आले.
या कार्यक्रमध्ये कोरोना ची जनजागृतीपर महिलांसाठी फॅशन शो चे देखील आयोजन करण्यात आले होते. यात अनेक महिलांनी उस्फूर्त पणे सहभाग घेतला.
यावेळी कार्यक्रमाला मॉडेल श्रेया तुपे,डॉक्टर अंजली चौगुले, राजीव फाउंडेशन चे प्रेसीडन्ट ऋषिकेश बालगुडे , फॅशन कोरिओग्राफर माधवी घोष , मनसे महिला अध्यक्ष ऍड. रुपाली पाटील ठोंबरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन RJ बंड्या याने केले.
यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी आणि प्रमुख पाहुण्यांनी सोनम पाटील यांचे व त्यांच्या संस्थेचे महिलांसाठी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याचे कौतुक केले..