अब्दुल सत्तार हे विकृत आहेत; अंबादास दानवे यांची टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० ऑक्टोबर २०२२


एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये निवडणूक चिन्हावरून संघर्ष सुरू आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन्ही गटांतील हा वाद आणखी वाढला आहे. विकासकामांच्या मुद्द्यावरून शिंदे गटातील नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवांमध्ये खडाजंगी झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सत्तार आणि शिंदे यांचे खासगी सचिव यांच्यातील कथित वादावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अब्दुल सत्तार हे विकृत आहेत. ते कोठेही गेले तरी असेच वागणार आहेत, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.शिवसेना नावासह धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यावरही अंबादास दानवे यांनी भाष्य केले असून भाजपवर टीका केली आहे. शिवसेनेच्या ताकदीवर भारतीय जनता पार्टी मोठा झाला. शिवसेनेचे बोट धरून हे मोठे झाले आहेत. हे शिवसेना फोडण्यासाठी मागच्या तीन वर्षांपासून प्रयत्न करतायत. शिवसेनेने या महाराष्ट्राला ताठ मानेनं जगायला शिकवले आहे. दिल्लीच्या समोर पाय चाटायला शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवले नाही, असा टोला दानवे यांनी लगावला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *