बाजारभाव नसल्याने अडीच एकर भोपळा रोटरला..

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.2/9/2021

बाजारभाव नसल्याने अडीच एकर भोपळा रोटरला

बातमी:-विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

मंगरूळ:- भोपळा व भेंडीला दर मिळत नसल्याने मंगरूळ येथील एका शेतकऱ्याने १ एकर भेंडी व अडीच एकर भोपळा पिकावर रोटर फिरवला आहे. शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की मंगरुळ (ता.जुन्नर) येथील भरतरी बबन कोरडे या शेतकऱ्यांने चांगला बाजारभाव मिळेल या आशेने आपल्या अडीच एकर क्षेत्रात भोपळ्याचे लागवड केली होती.सध्या तीन ते चार रुपये किलो दर मिळत असल्याने हा भोपळा विक्रीसाठी सुद्धा परवडत नाही.असे लक्षात आल्याने शेतकऱ्यांने त्याच खत कराच ठरवले.दर नसल्याने शेतकऱ्याने भोपळा रोटर ला आहे.तसेच आपल्या दुसऱ्या शेतात त्यांनी एकर क्षेत्रामध्ये भेंडीची लागवड केली होती. भेंडीला ही बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी भेंडी ही रोटरली आहे.आपली दोन्ही पीके बाजारभावा अभावी गेल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.कोरोनाच संकट त्यात वेळेवर पाऊस नाही. कसेबसे पाणी देऊन जपून ठेवलेला भोपळा आणि भेंडी याला दर नसल्याने शेतकऱ्याने हा निर्णय घेतला. लाखो रुपये खर्च करून सुद्धा उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडत चालला आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी राजा वरती अधिक मोठं संकट कोसळले आहे. कोणतं पीक घ्यावं, कोणत्या पिकाला बाजार भाव मिळेल हेही शेतकऱ्याला सध्या कळंन मुश्किल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *