नाशिक-नांदूरनाका इथे झालेल्या खाजगी बस अपघाताची सखोल चौकशी व्हायला हवी; राज ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ ऑक्टोबर २०२२


नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटे खासगी बसला झालेल्या अपघातानंतर बस पेटला होता. यात १३ जणांचा मृत्यू झाला असून १७ प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान अपघाताबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे. “आज नाशिक-नांदूरनाका इथे झालेला खासगी बसचा अपघात भीषण आहे. या अपघातात मृत झालेल्या प्रवाशांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अपघातात जखमी झालेले प्रवासी लवकर बरे होऊ देत ही आई जगदंबे चरणी प्रार्थना”, असे ट्वीट राज ठाकरे यांनी केले आहे.

 

तसेच “या अपघाताची सखोल चौकशी व्हायला हवी. गेल्या काही दिवसांत रस्त्यावरील अपघातांचं प्रमाण वाढते आहे. याकडे राज्य सरकारने लक्ष द्यायला हवे”, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *