भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, पुणे यांची शिरूर येथे बैठक संपन्न

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
१९/०९/२०२१.

शिरूर

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास, पुणे जिल्हा यांच्या वतीने, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शनिवार दि. १८ सप्टेंबर २०२१ रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत नव्याने काही नियुक्त्या देण्यात आल्या. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पूर्व पुणे जिल्हा सहसंघटक प्रकाश पाचर्णे होते, तर प्रमुख मार्गदर्शक भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास चे पुणे जिल्हा संघटक शिवाजी खेडकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष नितीन थोरात हे होते.

यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास चे पुणे जिल्हा विधी संघटक ऍड. संजय भुजबळ, सतीश भालेराव, सावळेराम आवारी, तुषार कुटे, नितीन देडगे, निलेश शिंदे, भरत घावटे, अमोल पाचुंदकर, दशरथ कापरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

पुढील काळात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत, शिरूर याठिकाणी बैठक आयोजित केली जाणार असून, त्यात सर्वसामान्य नागरिकांना आपल्या सामाजिक, शासकीय व इतर कामांबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती तुषार कुटे यांनी दिली.
तसेच भ्रष्टाचार रोखण्यासाठी नागरिकांनीही पुढे यावे, असे आवाहन भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास च्या वतीने करण्यात आलेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *