कु. पुर्वा रवींद्र खुडे स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हा मेरिटमध्ये : मान्यवरांच्या हस्ते रयतच्या शिरूर गट शाखेत झाला सत्कार

दि. १०/१/२०२३
शिरूर
रवींद्र खुडे : विभागीय संपादक


शिरूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जुलै २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इ. ५ वी व ८ वी वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात राज्यात व जिल्ह्यात, शिरूर तालुक्याने उत्तुंग यश मिळविल्याचे शिरूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी आपला आवाज न्युज नेटवर्कशी बोलताना सांगितले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचेही अभिनंदन करत पुढील उज्वल वाटचालीस प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

राज्यातून इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण ४ लाख १८ हजार ५५ विद्यार्थ्यांनी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३ लाख ३ हजार ८१९ अशा एकूण ७ लाख २१ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. यापैकी ६ लाख ६२ हजार १६३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली होती. यापैकी इ. ५ वी व इ. ८ वी चे एकूण १ लाख २६ हजार ५०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन, त्यातील २९ हजार १७१ विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार असल्याचे, पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी सांगितले.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे राज्य मेरिट मध्ये येणाऱ्या शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण विभागाचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे ग्रामीण विभागातील शिरूर तालुक्यातील विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे खूप कौतुक होत आहे.
शिरूर तालुक्यात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ८ वी) एकूण २२४ विद्यार्थ्यांनी यश मिळविले असुन, यात विशेष बाब म्हणजे राज्य मेरिटमध्ये आलेले सर्व पाच विद्यार्थी हे ग्रामीण विभागातील आहेत.

पूर्व उच्य माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ५ वी) एकूण ३७४ विद्यार्थ्यांनी यश मिळविले असुन, राज्यमेरिट मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ग्रामीण विभागातील ६ विद्यार्थी व शहरी विभागातील २९ विद्यार्थी आहेत.

शिरूर तालुक्यातील मलठण येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलची विद्यार्थिनी व सध्या रयतच्या शिरूर शाखेत शिक्षण घेत असलेली कु. पुर्वा रवींद्र खुडे या विद्यार्थिनीने जिल्हा मेरिट मध्ये स्थान पटकावलेले आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शाळा सिद्धी मुल्यमापन २०२२-२३ अंतर्गत, शिरूर येथे नुकतेच यासाठी शाळा तपासणी पथक आलेले होते. त्यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या पथकाचे चेअरमन व शिरूरचे माजी आमदर सूर्यकांत काका पलांडे होते. तर यात पथक प्रमुख म्हणून मोरगाव शाखेचे प्राचार्य के एच गिरमकर, तर पथकातील सदस्य आर बी गोळे, एस व्ही सादरे, आर के बांदल, पी के आटोळे, एच पी बालगुडे, पी बी खामगळ, एल जे पालसांडे, पी टी आडमुठे, जी व्ही बोरकर, तसेच शिरूर शाखेचे प्राचार्य राजेंद्र देशपांडे, उपमुख्याध्यापक मनोहर काळे, पर्यवेक्षक कृष्णा जगदाळे, एम सी व्ही सी विभागप्रमुख एस व्ही भोसले, वाणिज्य विभागप्रमुख जे एस कडेकर, टेक्निकल विभागप्रमुख एम एस माने या मान्यवरांच्या हस्ते कु. पुर्वा खुडे हीचा सत्कार करण्यात आला.

यावेळी न्यू इंग्लिश स्कूल, शिरूर येथील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

कु पुर्वा ही आपला आवाज न्युज नेटवर्क चे विभागीय संपादक व पत्रकार रवींद्र खुडे, तसेच न्यू इंग्लिश स्कूल च्या शिक्षिका सौ भारती रवींद्र खुडे (चांदणे) यांची कन्या आहे.

कु. पुर्वा च्या यशाबद्दल तिला शिक्षण, पत्रकारिता, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून तसेच नातलग व मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *