आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीने वागवले – मोहन भागवत

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ ऑक्टोबर २०२२


सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या इतिहासात अनेक शतके चाललेल्या सामाजिक विषमता आणि अस्पृश्यता संदर्भात अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आज आपण हे नाकारण्यात अर्थ नाही की आपण मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले आणि हा इतिहास आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले

मोहन भागवत म्हणाले की जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढय़ांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली. हा काळ चंद्रगुप्त साम्राज्याचा होता. वर्ण व जातीव्यवस्था आता भूतकाळ झाला आहे. कोणालाही विषमता नको. हीच सर्वाच्या मनातील गोष्ट डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेत समाविष्ट केली. ती आपण स्वीकारली आणि त्यानुसार आपण आचरण करण्याचा जोरकसपणे प्रयत्न करित आहोत, असेही डॉ. भागवत म्हणाले. आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीने वागवले. परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *