रोहित खर्गे
विभागीय संपादक
चिंचवड दि १६ मार्च २०२१
फेसबुक च्या एका ग्रुपवर माधव खरे व दिलीप चव्हाण या विकृत समाजकंटकांनी देशासाठी लढलेल्या चापेकर बंधू यांच्याबद्दल बदनामीकारक अशी पोस्ट व्हायरल केलेली होती. त्यामध्ये चापेकर यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काहीही संबंध नव्हता असे म्हणून त्यांना धर्मांध अतिरेकी असे संबोधले आहे.
या पोस्ट मुळे देशासाठी लढा देणाऱ्या तसेच अन्यायी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणाऱ्या चापेकर बंधू सारख्या महापुरुषांची बदनामी झालेली आहे.
ही बाब नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री काटे यांना निदर्शनास आणून दिली व संबधितांविरोधात पोलीस तक्रार करून कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली.
भाजपा नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, भाजयुमोचे प्रदेश सदस्य अजित कुलथे, सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय शाळिग्राम यांच्यासोबतच यात प्रामुख्याने अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगर मंत्री प्रथमेश रत्नपारखी, अशोक सैनी, सिद्धी जोशी, ऋषीकेश डोळे, वैदही जोशी, शुभम मोटे तसेच स्वातंत्र्यवीर सामजिक संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, कृष्णा वैद्य, सागर देशपांडे, संदीप गद्रे, रोहित मुणगेकर, केदार भातलवंडे आदी विविध संघटना व संस्थांचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांनी या घटनेचा निषेध करीत रितसर तक्रार देत कडक कारवाईची मागणी केली.
याप्रसंगी क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्याबद्दल अवमानकारक पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटक व्यक्तीविरूद्ध सायबर सेल तसेच चिंचवड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री.काटे साहेब यांनी तक्रार नोंद करून घेत.. लवकरच अशा व्यक्तीवर कारवाई होईल असे उपस्थित कार्यकर्त्यांना आश्वासन दिले.