बारामतीला घेरणं इतके सोप्प नाही; अजित पवारांचं भाजपला प्रत्युत्तर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ ऑक्टोबर २०२२


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील निवडक १६ मतदारसंघात थेट केंद्रातून नेते पाठवण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह काही भाजपाच्या काही नेत्यांनी बारामती मतदारसंघाचा दौरा करत राष्ट्रवादीचा घेरण्याची तयारी सुरु केली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते .अजित पवार म्हणाले, बारामतीला घेरणं इतके सोप्प नाही. प्रत्येक जण आपल्या परीने काम करत असतो. असे कितीतरी येतात, कितीतरी जातात. शेवटी मतदार काय निर्णय घेतात त्यावर ते अवलंबून असते. त्यामुळे भाजपा नेत्यांच्या वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *