नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्या अडचणीत वाढ… अरूण पाटे यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी साडेतीन वर्षानंतर गुन्हा दाखल

नारायणगाव
दि.14/04/2021
किरण वाजगे – कार्यकारी संपादक

नारायणगाव चे विद्यमान सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांच्यावर गेल्या महिन्याभरातील तिसरा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नारायणगाव येथील शेतकरी अरूण मार्तंड पाटे यांना गणपती मंडळात झालेल्या वादातून बेदम मारहाण केल्याप्रकरणी १५ ऑगस्ट २०१७ रोजी नारायणगाव पोलिस स्थानकात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र या घटनेचे मुख्य सूत्रधार व मुख्य आरोपी असलेले नारायणगावचे सरपंच योगेश नामदेव पाटे, अनिल दादाभाऊ खैरे व सुनील रामदास खैरे या तीन जणांवर त्या वेळी गुन्हा दाखल झाला नव्हता.


फिर्यादी अरुण मार्तंड पाटे यांनी जुन्नर न्यायालयामध्ये याबाबत फौजदारी आचारसंहिता कलम १५६/३ प्रमाणे घटना घडल्यानंतर काही दिवसांनी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार जुन्नर न्यायालयाने नारायणगाव चे विद्यमान सरपंच योगेश नामदेव पाटे व अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नारायणगाव पोलिसांना दिले. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.


दरम्यान या घटनेमधील आरोपी सचिन सुरेश नरवडे, संदीप सुरेश नरवडे , सोमनाथ मारुती तोडकरी, विकास शंकर म्हस्के, कमलेश किसन गावडे व सुजित संजय गाडेकर यांच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे. या सर्व आरोपींवर गुन्हा रजिस्टर नंबर ३९७/२०१७ भा.द.वी. कलम ३२६, ३२५, ३२४, १४३, १४७, १४८, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *