कोणीच मला मारू शकलं नाही, उद्धव ठाकरे यांना मी पुरून उरेन – नारायण राणे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ ऑक्टोबर २०२२


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राणे यांनी हा गंभीर आरोप केलाय.

उद्धव ठाकरे हे लबाड लांगडे आहेत. कारण ते खूप खोटं बोलतात. उद्धव ठाकरे यांनीच सदा सरवणकर यांना मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करायला सांगितलं होतं. शिवाय मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती. परंतु, आज मी जिवंत आहे, कोणीच मला मारू शकलं नाही. उद्धव ठाकरे यांना मी पुरून उरेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मर्यादा राखावी. उद्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार उद्धव ठाकरे असतील. आम्ही आमच्या नेत्यांना बोललेलं खपवून घेणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिलाय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *