रोहित शर्मानी भर मैदानात टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला केली शिवीगाळ
०५ डिसेंबर २०२२
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या एका कृतीमुळे चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. रविवारी ढाका येथे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाच्या खेळाडूला शिवीगाळ केली. शेवटच्या काही षटकांत सामना हातातून निसटताना पाहून कर्णधार रोहित शर्मा अनियंत्रित झाला.

लाईव्ह मॅच दरम्यान ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून कर्णधार रोहित शर्माला शिवीगाळ करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वॉशिंगटन सुंदर याने शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवरती मेहदी हसन मिराज याचा झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. त्यामुळे रोहित शर्मा चांगलाच संतापला होता. त्याच्या आगोदर टीम फलंदाज केएल राहूल याने सुध्दा मेहदी हसन मिराज याचा कॅच सोडला होता. त्यामुळे रोहित अधिक संपातल्याचं पाहायला मिळालं.