शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ ऑक्टोबर २०२२


दसरा मेळाव्याच्या निमित्ताने घडणाऱ्या राजकीय घडामोडी थंडावत असताना आता शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरून निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीचं राजकारण तापू लागलं आहे. शिंदे गट आणि शिवसेनेकडून आयोगासमोर प्रतित्रापत्र सादर करण्यात येत असून त्यासंदर्भात सुनावणी घेतली जाणार आहे. मात्र, सुनावणीआधीच दोन्ही बाजूंनी धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळेल, असे दावे करण्यात येत आहेत. यासंदर्बात चंद्रकांत खैरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

शिवसेनेचा इतिहास सांगताना चंद्रकांत खैरेंनी धनुष्यबाण हे पक्षाचं लकी चिन्ह असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. १९६८ला पालिकेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत ४२ नगरसेवक धनुष्यबाणावर निवडून आले. तेव्हापासून धनुष्यपबाण चिन्ह हे आमचं लकी चिन्ह आहे, असं खैरे म्हणाले आहेत. हळूहळू एकनाथ शिंदे म्हणतील की त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे. पंतप्रधानपदाचीही स्वप्नं ते पाहतील. मग देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी काय करणार?” असा खोचक सवाल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे आधी नगरसेवक झाले, नंतर सभागृहनेते झाले, आमदार झाले, विरोधी पक्षनेते झाले. शिवसेना-भाजपा युतीमध्ये त्यांना चांगली खातीही दिली. त्यांना नगरविकास खातंही दिलं. मुख्यमंत्र्यांकडचं खातं त्यांना देण्यात आलं. एवढं झाल्यानंतरही त्यांची अपेक्षा खूपच आहे आणि त्यासाठी त्यांना फोडाफोडी करायची आहे, असंही खैरे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *