रक्षाबंधन एक धागा भाऊ बहिणीच्या नात्यातील ऋणानुबंधाचा…

जुन्नर प्रतिनीधी
११ ऑगस्ट २०२२


राखी पौर्णिमा म्हणजे भाऊ बहिणीमधील हळुवार प्रेमळ नात्याचा सण.मायेने बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते तो दिवस. भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतीक व बहीण-भावाचे अतूट नाते सांगणारा हा सण.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जुन्नर तालुक्यातील विविध भागातून आलेल्या अनेक भगिनींनी नारायणगाव येथील आमच्या निवासस्थानी येऊन मला प्रेमाने आपुलकीने राख्या बांधल्या आणि रक्षाबंधन सण साजरा केला. या दिवसाची मी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या बहिणींना भेटून आनंद व्यक्त करण्याचा हा दिवस. आज दिवसभरात तालुक्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या माझ्यावर माया असणाऱ्या या सर्व भगिनींनी आजचा दिवस अविस्मरणीय केला.
या रेशमी क्षणांची भावना मला शब्दांत व्यक्त करता येत नाहीये.

आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केल्या भावना

आपल्या या जिव्हाळ्याच्या नात्याची कायम जाण ठेवून, सचोटीने, उत्साहाने आणि आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा आज मला मिळाली. हा रेशमी धागा आयुष्यभर अतूट राहील हा भाऊ तुमच्या प्रत्येक सुख दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील याची खात्री देतो. या पवित्र सणाच्या निमित्ताने माझ्या सर्व भगिनींना मी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमदार अतुल बेनके जुन्नर विधानसभा.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *