निगडी : शिव आरोग्य सेनेच्या (ठाकरे गट)पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. दादर येथील शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शहर कार्यकारिणीत पुणे जिल्हा समन्वयकपदी सुखदेव नरळे, शहर सहसचिव मंजूषा लोहटे, समन्वयकपदी दिलीप सावंत, भोसरी विधानसभा संघटक लिंबाजी जाधव, समन्वयक बाळासाहेब वाघ, सहसंघटक राहुल चौधरी, विभाग संघटक संतोष वरे तर चिंचवड संघटकपदी पांडुरंग फाटकर, समन्वयक अनिल कोळी, सहसंघटक दीपक पाटील आदींचा समावेश आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरंभलेल्या आरोग्य यज्ञाची व्याप्ती शिव आरोग्य सेनेची योजना गरजू रुग्ण तसेच तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविणार असल्याचे सुखदेव नरळे यांनी सांगितले. यावेळी उपनेते रवींद्र मिर्लेकर, उपनेते भाऊ कोरगावकर, शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, उपाध्यक्ष डॉ. जयवंत गाडे तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
पिंपरी : गणेश विसर्जनासाठी शहरातील घाटांवर व्यवस्था तैनात; आयुक्तांची माहिती…
पिंपरी :- गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज असून शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर गणेश मंडळांसाठी तसेच नागरिकांसाठी सोयी सुविधा…