अजित पवार माझे चांगले मित्र -चंद्रशेखर बावनकुळे

३० डिसेंबर २०२२

नागपूर


अजित पवार माझे चांगले मित्र, त्यांची आणि माझी चांगली मैत्री, पण अचानक त्यांनी माझ्याबाबत ही भूमिका का घेतली, हे कोडे मला अजूनही उलगडलेले नाही, असे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विधान परिषदेत म्हणाले. अजित पवार बावनकुळें यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचा संदर्भ देत बावनकुळे म्हणाले, बारामतीत जाऊन मी आमच्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणा.असे आवाहन बारामतीच्या जनतेला केले होते. त्यांना एवढे वाईट का वाटले?. मी तर त्यांचे नावही घेतले नाही. तरी ते नाराज झाले.

आमचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे तेथे आमच्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणणे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावे, आम्ही आमच्या पक्षाचे काम करु. अजितदादांनी एवढे मनावर घ्यायची गरज नव्हती. शेवटी जनताच निर्णय करते. राजकारणात किल्ले उध्वस्त होतच असतात. त्यांचेही किल्ले उध्वस्त झाले आणि आमचेही चांगले किल्ले उध्वस्त झाले. त्यामुळे जनता ठरवेल काय करायचे. अजितदादांनी एवढे नकारात्मक होऊन खालच्या सभागृहात तो विषय उपस्थित करण्याची गरज नव्हती.असे बावनकुळे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *