दुर्मिळ जखमी बहिरी ससाण्याला दिले जीवदान

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
२६ ऑक्टोबर २०२१

खामुंडी


अत्यंत देखणा,दुर्मिळ असलेला व कधीतरी रानावनात नजरेस पडणाऱ्या एक पंख जखमी असलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या बहिरी ससाना या पक्षाला एका पक्षीप्रेमी युवक शेतकऱ्याने जीवदान दिले व त्याचे थोड्याशा प्रमाणात आरोग्य सुधारल्यावर ओतूर वनविभागाच्या ताब्यात दिले ,वनविभाग अधिकाऱ्यांनी त्या पक्षाची तातडीने दखल घेत त्यास पुढील उपचारार्थ माणिकडोह येथे पाठविले आहे. ता.२६ रोजी खामुंडी (ता.जुन्नर) येथील पक्षीप्रेमी शेतकरी हेमंत दीपक बोडके हे आपल्या शेतावर दैनंदिन शेतकामासाठी गेले असता हा बहिरी ससाना एक पंखाला अज्ञात कारणाने इजा झाल्यामुळे तडफडत जमिनीवर पडला होता बोडके यांनी पहिल्यानंतर कुठलाही विचार न करता पक्षी प्रेमी म्हणून तातडीने पाणी पाजून शेतावर असलेल्या खोलीत नेले व त्यास खायला देऊन प्रथोमोपचार करून वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.वनविभागाने पुढील उपचारासाठी त्यास माणिक डोह येथे पाठवण्यात आले असून हेमंत बोडके चे विविध स्तरातून कौतुक केल जात आहे.

दुर्मिळ जखमी बहिरी ससाण्याला दिले जीवदान

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *