पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण संपन्न

१२ डिसेंबर २०२२


राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हे लोकार्पण पार पडलं. नागपूर ते मुंबई असा ७०१ कि.मी. लांबीच्या या महामार्गावरील नागपूर ते शिर्डी हा टप्प्या सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *