रेशन कार्ड धारकांची दिवाळी गोड होणार

०५ ऑक्टोबर २०२२

मुंबई 


राज्यातील गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकार रेशनिंगवर शिधा संच देणार आहे . राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . १०० रुपयांत मिळणाऱ्या या संचात १ किलो रवा , १ किलो चणाडाळ , १ किलो साखर आणि १ लीटर पामतेल याचा समावेश असेल . या निर्णयामुळे पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना चांगली भेट देत सर्वांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.या निर्णयाचा राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ होणार आहे.

राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय,अंत्योदय योजनेतील लाभार्थीनाच योजनेचा लाभ

हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येणार असून , रेशनिंगवर त्याचे वितरण ई – पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे . यासाठी ५१३ कोटी २४ लाख खर्च येणार आहे . त्याबाबतचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. हा शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी व्हावा , त्याचप्रमाणे या वाटप वाटपात कुठल्याही तक्रारी येऊ नयेत , याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *