यशवंतराव चव्हाण विद्यालयातील 9 विद्यार्थांना एन एम एम एस शिष्यवृत्तीपरीक्षेत यश

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
 ०७ सप्टेंबर २०२२

घोडेगाव


राष्ट्रीय विकास केंद्र संस्थेच्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत येथील 9 विद्यार्थांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन एम एम एम) परीक्षेत यश संपादन केले असल्याची माहिती मुख्याध्यापक श्री. अविनाश ठाकूर यांनी दिली. विद्यालयातील एकूण 33 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 06 विद्यार्थी एन एम एम एस शिष्यवृत्तीस व 03 विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या 6 विद्यार्थांना प्रत्येकी 48 हजार रुपये तर 3 विद्यार्थांना प्रत्येकी 36 हजार 600 रुपये पुढील चार वर्षासाठी मिळणार आहेत.

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थांना श्री राजेंद्र अरगडे, श्री.संजय वळसे, श्री.वैभव गायकवाड, सौ. वैशाली काळे,सौ.वंदना मंडलिक, सौ.माणिक हुले,सौ. लक्ष्मी वाघ या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा.ना. दिलीपराव वळसे पाटील साहेब, उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब बेंडे, विश्वस्त पूर्वाताई वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरजित खराडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती श्री.प्रकाशराव घोलप, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.राजाभाऊ घोलप, शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री राजू पानसरे आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री कुमार घोलप यांनी केले.

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी पुढील प्रमाणे-
एन एम एम एस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी – सोहम घोडेकर, श्वेता सूर्यवंशी,गौरवी काळे,साक्षी गायकवाड, वैष्णवी एडके, सुमित सुपे.
सारथी शिष्वृत्तीधारक- ईश्वरी मोरे,सानिका मुरकुटे, आदिती काळे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *