दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलाला आले अच्छे दिन

पिंपरी प्रतिनिधी
०५ ऑक्टोबर २०२२


कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ग्राहकांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे दसऱ्यानिमित्त झेंडू मागणीही फुलांना वधारली. अतिवृष्टीचा फटका बसल्याने झेंडूच्या फुलांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे झेंडूसह इतर फुलांचेही भाव वधारले आहेत. किरकोळ बाजारात झेंडू १२० ते १६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. शेवंतीचे भावही वाढले असून गुलाब ५०० ते ६०० रुपये किलोवर पोहोचला आहे. खंडेनवमी व दसरा सणाला झेंडूच्याफुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. पूजेसह घराला तोरण बांधणे , सजावट , वाहनांना तसेच अन्य महत्त्वाच्या वस्तूंना झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात . त्यामुळे मागणी लक्षात घेता विक्रीतून चांगली कमाई होईल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र , अतिवृष्टीमुळे फुलांचे मोठे नुकसान झाले होते . त्यामुळे दसऱ्याच्या काळात फुलांचे भाव चढेच असतील, असे बोलले जात होते . मात्र , अचानकच बाजारातील झेंडूच्या फुलांची आवक वाढल्याने भाव अपेक्षेपेक्षा कमी असले तरी वाढलेले आहेत. बाजारात मंगळवारी फुलांची आवक कमी झाली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *