मिलिंद नार्वेकर देखील शिंदे गटात सहभागी होतील; गुलाबराव पाटील यांचा दावा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०१ ऑक्टोबर २०२२


एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेला धक्कांवर धक्के बसत आहेत. तसेच सध्या खरी शिवसेना कोण’ यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमध्ये वाद सुरु आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चांगेलच राजकारण तापले आहे. आता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आता त्यांच्यानंतर उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर देखील शिंदे गटात सहभागी होतील असं विधान गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

गुलाबराव पाटील यांनी खोके घेतले म्हणता, पण आयुष्यभर बाळासाहेबांची सेवा करणारे चंपासिंह थापाने काय केले? त्यांनी बाळासाहेबांच्या चरणी संपूर्ण आयुष्य घालवले, ते देखील उद्धव ठाकरेंना सोडून आमच्यासोबत आले आहेत. थापा आले, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत असं गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *