क्रेडिट कार्ड, ईएमआयने वाढविले तरुणांचे टेन्शन

पिंपरी प्रतिनिधी
०४ ऑक्टोबर २०२२


गेल्या काही दिवसांत तरुणांचे उत्पन्न वाढले आहे . त्यामुळे बँकांकडून क्रेडिट कार्डसह विविध ऑफर्स दिल्या जातात . परिणामी अनेकजण क्रेडिट कार्ड घेऊन वस्तूंची खरेदी करतात . मात्र , पैसे भरण्याची वेळ आल्यावर टेन्शन वाढते . त्यामुळे चिडचिडेपणा , ताणतणाव , मानसिक आरोग्य बिघडत आहे. परिणामी क्रेडिट कार्ड , ईएमआय तरुणांचे टेन्शन वाढवित असल्याचे चित्र आहे . क्रेडिट कार्डवर विविध ऑफर्स येत असल्याने पगारदार वर्गाचा कार्ड घेण्याकडे कल आहे. कार्डवरून एखादी वस्तू घेतल्यास पैसे भरण्यासाठी ३० ते ४५ दिवसांची सवलत मिळते . मात्र ,अनेकजणांचे नियोजन होत नसल्याने पैसे भरण्याच्या वेळी जुळवाजुळव करावी लागते . गरज असेल तर क्रेडिट कार्डची संबंधित बँकेकडे मागणी करावी जेवढी मर्यादा ठरवून दिली आहे त्यापेक्षा कमीच खर्च करावा.

पगारावर ‘ ईएमआय’चा बोजा किती असावा पगार झाल्यावर घरभाडे , किराणासह इतर खर्चाची तजवीज करावी लागते . त्यामुळे पगारातून शिल्लक पैशातून ईएमआय भरता येईल अशी तरतूद करणे आवश्यक आहे . योग्य नियोजन न केल्यास कर्जबाजारी होण्याची वेळ येते. पगार वाढला, आनंद कमी झाला सध्या पगारवाढ होत असली तर महागाईनेही उच्चांक गाठला आहे. परिणामी, महिन्याच्या खर्चात वाढ झाली आहे . त्यामुळे पगार वाढला असला तरी आनंद कमी झाला असल्याचे चित्र आहे. योग्य नियोजन करावे आर्थिक व्यवहार करताना तो वेळेत पूर्ण होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे . वेळेत भरणा न केल्यास ताणतणाव निर्माण होतो . त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो . त्यामुळे योग्य नियोजन आवश्यक आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *