मला पेंग्विन सेना म्हटल्याचा अभिमान आहे; आदित्य ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०१ ऑक्टोबर २०२२


भाजप नेत्यांकडून शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना अनेकदा पेंग्विन म्हणून हिणवले जाते. पेंग्विन सेना, म्याऊ म्याऊ मांजर अशा शब्दांत आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला जातो. पण आता आदित्य ठाकरे यांनीही टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मला पेंग्विन सेना अभिमान आहे. मी जेव्हा पेंग्विन मुंबईत आणले, ते पाहण्यासाठी प्राणी संग्रहालयात नागरिकांची गर्दी वाढली. तुम्ही पेंग्विन सेना बोलत रहा, महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत आम्ही अनेक विकासकामे केली आहेत, मग त्या नावानेही आम्हाला बोला. आम्हाला कोस्टल रोड सेनाही म्हणा, असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी विरोधकांना दिला आहे. तसेच खोके सरकारने टीका करणे, हे आता हास्यास्पद झाले आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *