राजुरीत आढळला मृतावस्थेत बिबट्या

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१२ फेब्रुवारी २०२२

बेल्हे


राजुरी येथील गोगडी मळयात आज शनिवार दि.१२ रोजी सकाळी मृतावस्थेत बिबटया नागरिकांना दिसून आला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजुरी (ता.जुन्नर) येथील गोगडी मळयामधील दुर्गामातानगर मध्ये रहात असलेले उमेश शंकर नायकवडी हे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घराच्या बाजुला असलेल्या शेतावर कांद्याला पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांणा एक बिबटया मृतावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती त्यांणी वनविभागाचे अधिका-यांणा दिली.घटनास्थळी वन अधिकारी संतोष साळुंखे,त्रिंबक जगताप,स्वप्नील हाडवळे यांणी भेट दिली असता त्यांणी त्याचा पंचनामा करून पोस्ट मार्टम साठी माणिक डोह येथील बिबटया निवारण केंद्रात पाठवले आहे.तसेच मृतावस्थेत सापडलेला बिबटया हा नर जातीचा असुन दोन बिबटयांच्या झालेल्या हल्ल्यात याचा जखमी होऊन मुत्यू झाला आहे असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *