पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील – अमोल मिटकरी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
३० सप्टेंबर २०२२


काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील असं मिटकरींनी म्हटलं आहे. तसेच त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या तर त्यांचं स्वागतच असल्याचं विधानही मिटकरींनी केलं आहे. पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात सुप्रिया सुळेंचंही मत सकारात्मक असल्याच मिटकरींनी म्हंटलं आहे.

भारतीय जनता पार्टी पंकजाताईंना सातत्याने डावलण्याचा प्रयत्न करत आहे, आतापर्यंत त्यांना विधान परिषदेवर संधी दिलेली नाही. त्या गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत. एवढ्या मोठ्या नेत्याच्या कन्या असूनही आतापर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही’, असंही मिटकरी म्हणाले. तसेच पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देतील एवढं मात्र नक्की असं मिटकरींनी म्हटलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *