लोकजागृती चळवळीच्या वतीने ऑगस्टक्रांती दिन व आचार्य आनंदऋषी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. १०/०८/२०२१.

शिरूर शहरातील लोकजागृती चळवळीच्या वतीने, ऑगस्ट क्रांतीदिन व राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषी महाराज, यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात एकूण ५७ जणांनी रक्तदान केले .
क्रांतीदिनानिमित्त क्रांतीचौकातील हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन करण्यात आले.

यावेळी लोकजागृती संघटनेचे ॲड ओमप्रकाश सतीजा, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, नगरसेवक मंगेश खांडरे, शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती ॲड. प्रदिप बारवकर, संतोष शितोळे, प्रा. रवींद्र गणोरकर, मनसेचे जिल्हा उपप्रमुख महिबूब सय्यद, खुशाल गाडे, माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, संजय बांडे, जयवंत साळुंखे, विलास पोटे,

निलेश नहार, ॲड. दिपक वाघ, मोहम्मद हुसेन पटेल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यानिमित्ताने शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालयात झालेल्या रक्तदान शिबीरात एकूण ५७ जणांनी रक्तदान केले.

तसेच, ‘मी विजेता होणारच’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करणारे उमेश कणकवलीकर, यांनी आपले १११ वे रक्तदान केले, तर शिरुर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी ५८ वे रक्तदान व शिरूर शिक्षण मंडळाचे माजी सभापती निलेश खाबिया यांनी ५५ वे रक्तदान केले.
सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथील रक्तपेढीने, या शिबीराला विशेष सहकार्य केल्याचे, यावेळी रवींद्र धनक यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कला माहिती देताना सांगितले.
शिरुर मधे क्रांती दीन निमित्ताने गेली 29 वर्षे सातत्याने आयोजित केल्या जाणार्‍या या शिबिरात जैन साध्वी संयम लताजी, अमित प्रज्ञाजी, कमल प्रज्ञाजी आणि सौरभ प्रज्ञाजी यांनी उपस्थितांना शुभ आशीर्वाद दिले. तर साध्वी कमल प्रज्ञाजी यांनी रक्तदान केले.
यावेळी शिरुर जैन संघाचे संघपती भारत चोरडिया, राहुल बोथरा, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, शिरुर नगर परिषदेचे रविन्द्र साळुंखे, जिवन विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शिंदे, विद्रोही शाहीर चंद्रकांत झुंजार, अजीम सय्यद, आणि शिवसेनेचे संघटक राजेंद्र परदेशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *