अनुदिप फाऊंडेशन व जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्यात प्रशिक्षणविषयी सामंजस्य करार

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२१ सप्टेंबर २०२२

नारायणगाव


कोलकाता येथील अनुदिप फाऊंडेशन व कुरण येथील जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या विद्यार्थी प्रशिक्षण व प्लेसमेंट बाबत नुकताच सामंजस्य करार पार पडला. या करारांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध कंपण्यांच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे. तसेच सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून कंपनीमध्ये नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सध्याच्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे तंत्रकुशल मनुष्यबळ तयार करण्याचे आव्हान आज शिक्षण क्षेत्रात उभे आहे.

इंजिनिअरींग चे शिक्षण घेत असताना बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची ओळख होणे व त्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे हे प्रशिक्षणाशिवाय शक्य होत नाही. अनुदिप फाऊंडेशनच्या माध्यमातून सदरचे प्रशिक्षण युनायटेड वे कंपनीच्या सी.एस.आर. फंडामधून उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांना ही एक संधी चालून आलेली आहे. ज्या प्रशिक्षणाठी शहरात जाऊन मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो तेच प्रशिक्षण आपल्या महाविद्यालयात उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल म्हणून विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींचे प्राचार्य डॉ डी. जे, गरकल यांनी विद्यार्थ्यांना केले.

या सामंजस्य करार प्रसंगी अनुदिप फाउंडेशनचे प्रकल्प सल्लागार तुषार रायगुडे व अभिषेक राक्षे तसेच जयहिंद शैक्षणिक संकुलाच्या संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे, शैक्षणिक समन्वयक डॉ. वैशाली धेडे, विभागप्रमुख डॉ. आनंद खत्री, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. गणेश कदम उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *