आपला आवाज न्यूज नेटवर्क
२९ सप्टेंबर २०२२
महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा वाटा होता. गेलेली सत्ता पुन्हा आणण्यासाठी शरद पवार आता कोणती रणनीती अवलंबणार याची चर्चा आहे. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे. इंदापूरमध्ये आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळें बोलत होत्या.
शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात,” असं सूचक विधान सुप्रिया सुळेंनी केलं आहे.