उपप्राचार्यपदी प्रोफेसर डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर यांची नेमणूक

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
३१ जानेवारी २०२२

घोडेगाव


घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर यांची नेमणूक झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव यांनी दिली. प्रोफेसर डॉ.वाल्हेकर हे मराठीतील आदिवासी साहित्याचे अभ्यासक आणि समीक्षक म्हणून ओळखले जातात.त्यांचे सहा ग्रंथ प्रकाशित असून त्यांनी महाविद्यालयात विद्यापीठ, राज्यस्तरीय,राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करून महाविद्यालयास नावलौकिक प्राप्त करून दिलेला आहे.ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्शक आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजमितीस चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केलेले आहे.त्यांच्या नेमणूकीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.सुरेशशेठ काळे,उपाध्यक्ष श्री. तुकाराम काळे,कार्याध्यक्ष श्री.शिवाजीराव घोडेकर,सचिव अॕड.मुकुंदराव काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर,न्यू इंग्लिश मेडियमचे चेअरमन श्री.अजितशेठ काळे, प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव, सर्व पदाधिकारी, संचालक, सल्लागार,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,सेवक, आजी माजी विद्यार्थी इ.नी त्यांचे अभिनंदन केले आहे.