पी एफ आय च्या देशद्रोही कृत्याबाबत शिवसेना आक्रमक : रास्तारोको करत केला निषेध

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
२७ सप्टेंबर २०२२

शिरूर


नुकतेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पी.एफ.आय च्या आंदोलकांकडून पाकिस्तान जिंदाबाद व हिंदुस्थान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. या घटनेचा संपूर्ण देशभर सर्व हिंदुस्तानी लोकांनी निषेध केला होता. तसेच केंद्र व राज्य सरकारकडून, अशा देशद्रोही घोषणा देणाऱ्या आंदोलकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र अशा देशद्रोही घोषणांच्या विरोधात शिवसेना कमालीची आक्रमक झाल्याचे सर्वत्र चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर या घटनेच्या निषेधार्थ, शिरूर तालुक्यातील शिक्रापुर येथील चाकण चौकात, शिरूर तालुका शिवसेना तसेच शिरूर शहर व युवासेनेच्या वतीने काही काळ रास्ता रोको करत जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या पाकिस्तान धार्जिण्या घोषणांचा, आपल्या मनोगतात खरपूस समाचार घेतला.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, महिला संघटक चेतना ढमढेरे, शिरूर शहरप्रमुख सुनिल जाधव, उपतालुकाप्रमुख अमोल हरगुडे, उपतालुकाप्रमुख अनिल पवार, युवासेना तालुकाप्रमुख विजय लोखंडे, उपतालुकाप्रमुख संतोष भोंडवे, उपतालुकाप्रमुख नितीन दरेकर, युवासेना चिटणीस वैभव ढोकले, उपतालुकाप्रमुख राहुल शिंदे, उपविभागप्रमुख नाना गिलबिले, स्वप्नील रेड्डी, युवासेना उपशहरप्रमुख उत्तम कान्हुरकर, बाळासाहेब दाते, योगेश दरेकर, युवासेना शाखाप्रमुख नाना भुजबळ, अतुल विश्वासे, सचिन मुळे, नितीन मुळे, विकास नरके, आकाश सुर्वे, सुजीत विरोळे, अभि सुर्वे, सत्यवान हरगुडे, अनिल सातकर, वंदना ढमढेरे, संतोष झरे, नाना वाबळे, दिनेश जगताप, राहुल रणधिर, महेंद्र येवले, सुरज काळे, अक्षय पवार, सुरेश आरेवार यांसह शिवसैनिक, युवासैनिक, महीला आघाडी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *