महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर | शहराध्यक्षपदी पराग कुंकुलोळ

पिंपरी दि. ११ फेब्रुवारी २०२१ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष पदी पराग कुंकुलोळ यांची निवड करण्यात आली.पुणे येथील पत्रकार कार्यालयात झालेल्या बैठकीत पिंपरी चिंचवड शहराची कार्यकारणी जाहीर झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक व राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंढे, सरचिटणीस विश्वास आरोटे, ज्येष्ठ पत्रकार ॲड संजय माने, पुणे जिल्हा अध्यक्ष नितीन शिंदे आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष मुंढे यांनी कुंकुलोळ यांना नियुक्तीचे पत्र देवून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पिंपरी चिंचवड कार्यकारणी: अध्यक्ष पराग कुंकुलोळ, उपाध्यक्ष शिवप्रसाद डांगे, कार्याध्यक्ष जमीर सय्यद, सचिव निलेश जंगम, सह. सचिव औदुंबर पाडूळे, संपर्क प्रमुख महादेव मासाळ, संघटक विजय जगदाळे, खजिनदार शशिकांत जाधव, सह. संपर्क प्रमुख योगेश घाडगे, प्रसिद्धी प्रमुख प्रसाद वडघुले, सह. प्रसिद्धी प्रमुख सागर झगडे,
कार्यकारिणी सदस्य म्हणून बेलाजी पात्रे, सुनील बेनके, बलभीम भोसले, संदीप सोनार, सदस्य, प्रमोद सस्ते यांची निवड करण्यात आली आहे.