विनातिकीट प्रवास करणाऱ्यांनो सावधान एक लाख ५ हजार रुपये दंड वसूल

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२६ सप्टेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी ,एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना तिकीट काढून प्रवास करणे सक्तीचे आहे ; परंतु काही महाठग पैसे वाचविण्याच्या नादात तिकीट न काढता प्रवास करतात . अशा महाठगांकडून पुणे जिल्ह्यातील एसटी प्रशासनाकडून चार महिन्यांत एक लाख ५ हजार रुपये दंड वसूल केला . गेल्या काही दिवसांपासून निर्बंध हटविण्यात आल्याने सर्व ठिकाणी गर्दी वाढत आहे . यामुळे एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

एसटीच्या उत्पन्नात भरही पडत आहे ; परंतु या गर्दीच्या काळात फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या ही वाढली आहे . त्यामुळे अशा प्रवाशांकडून तिकीट चेकरकडून दंड वसूल करण्यात येत आहे. प्रसंगी तिकीट काढून प्रवास करण्यात यावी, असा सल्लादेखील देण्यात येत आहे. एसटीच्या पथकाकडून करण्यात आलेल्या तपासणीत गेल्या चार महिन्यांत ८२ फुकटे प्रवासी सापडले आहे . त्यांच्याकडून एक लाख ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे .


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *