भा. वि. कांबळे यांच्या नावाने पुणे जिल्हा पत्रकार संघ दरवर्षी पुरस्कार देणार – एस.एम देशमुख

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२६ सप्टेंबर २०२२

पिंपरी


पवना समाचारच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारितेचा पाया रचणारे पत्रकार भा. वि. कांबळे यांच्या नावाने पुरस्कार देऊन दरवर्षी पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील एका पत्रकाराचा सन्मान केला जाईल अशी घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी रविवार दि २५ सप्टेंबर रोजी पिंपरी येथे केली. पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने भा. वि. कांबळे पुरस्कार देऊन वरिष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी एस.एम देशमुख बोलत होते.

आपल्या भाषणात देशमुख म्हणाले, पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी पाच पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.. याची सुरूवात येत्या अधिवेशनापासून करण्यात येईल. या अधिवेशनात भा. वि. कांबळे यांच्या नावाने पुरस्कार देऊन त्याच्या कार्याला उजाळा दिला जाणार आहे.

देशमुख म्हणाले, भा. वि. कांबळे हे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते.. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, नाट्य कलावंत, विचारवंत म्हणून ते परिचित होते.. ज्या काळात पिंपरी चिंचवडमधये कोणतीही साधनं उपलब्ध नव्हती त्या काळात त्यांनी पवना समाचार सुरू करून पिंपरी चिंचवडच्या विकासात योगदान दिले.. त्यांच्या नावाचा पुरस्कार शिवाजी शिर्के यांना दिला जात असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे.. शिवाजी शिर्के यांनी पवना प्रवाहच्या माध्यमातून आदर्श पत्रकारिता केली… त्यांचा नव्या पिढीने आदर्श घेतला पाहिजे असेही देशमुख यांनी सांगून शिवाजी शिर्के यांचे अभिषटचिंतन केले.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले,सुरज साळवी, आदिंची भाषणं झाली.. परिषदेचे विभागीय सचिव अरूण तथा नाना कांबळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येनं पत्रकार उपस्थित होते. आभार अविनाश अदक यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *