आकुर्डी येथे लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२४ सप्टेंबर २०२२

आकुर्डी


आकुर्डी येथील जनावरांमध्ये प्रामुख्याने गाय व तत्सम जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे . लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात यावी , अशी येथील पशुपालकांनी मागणी केली आहे . आकुर्डी गावातील गुरुदेवनगर येथील पशुपालक दत्तात्रय पांढरकर यांच्या गोठ्यातील गाईला लम्पी रोगाची बाधा झाली आहे . गोठ्यातील गाय व इतर जनावरांना बाधा होऊन संसर्ग होऊ नये यासाठी ते काळजी घेत आहेत.

पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने तत्काळ उपाययोजना करण्यात यावी व लसीकरण मोहीम राबवण्यात यावी , अशी मागणी पांढरकर यांनी मागणी केली आहे . लम्पी रोग निर्मूलनासाठी वैद्यकीय पथक स्थापन केले आहे . नागरिकांनी लसीकरणासाठी संपर्क साधल्यास गोठ्यात नसीकरण करण्यात येईल , आत्तापर्यंत ३८० जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे . पशुपालकांनी गाय व इतर तत्सम जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे आढळल्यास त्वरित पशुवैद्यकीय
पशुवैधकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा…


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *