मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजना

पिंपरी प्रतिनिधी
२४ सप्टेंबर २०२२


गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय म्हणून अनेक लोकांनी पोस्टला प्राधान्य दिलेले दिसून येते. त्याचबरोबर पोस्टानेही अनेक विविध योजनाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना.ही योजना मुलींच्या कल्याणासाठी सुरू केलेली आहे.

गर्व से कहो, बेटीया है हमे जान से भी प्यारी, इनके लिए सुकन्या समृद्धी योजना हे न्यारी! अशा प्रकारचे पोस्ट खात्याने केलेले भावनिक अहवाल लोकांच्या थेट हृदयाला भिडल्याचे दिसून येते. मुलींच्या प्रति संवेदन असणाऱ्या अनेक पालकांनी या योजनेस अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे.

मुलींच्या कल्याणासाठी पोस्ट खात्याने सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना कमी कालावधीतच लोकप्रिय झालेली आहे, शहरातील 33 पोस्ट कार्यालयामध्ये मिळून सुकन्या योजनेची दरमहा साधारण 2000 खाती उघडली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामधून पालकांना असलेल्या मुलींच्या भविष्याची काळजी समोर येत आहे.

गर्व से कहो, बेटीया है हमे जान से भी प्यारी, इनके लिए सुकन्या समृद्धी योजना हे न्यारी!

सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे – 
1. मुलीचा जन्म दाखला
2.पालकांचे /आई-वडिलांचे ओळखपत्र/ रहिवासी दाखला/ पॅन कार्ड आधार कार्ड
3.पालकाचे/ आई-वडिलांचे फोटो

योजनेची माहिती – 

● नैसर्गिक पालनकर्ता ( आई वडील ) / कायदेशीर पालकांद्वारा मुलींच्या नावाने खाते उघडले जाईल .
● केवळ दोन मुलींच्या नावे खाते उघडण्याची अनुमती .
जन्म तारखेपासून वयाच्या १० वर्षापर्यंत खाते उघडता येईल .
● पालक / कायदेशीर पालकांच्या के . वाय . सी . कागदपत्राबरोबर मुलीच्या जन्माचा दाखला आवश्यक .
● नामनिर्देशनाची सोय उपलब्ध सुरुवातीस रु .२५० / – इतक्या रकमेने खाते उघडता येईल .
● नंतर रु . १०० / – किंवा त्याच्या पटीत खाते उघडल्यापासून १५ वर्ष पूर्ण होईपर्यंत जमा करता येते .
● एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त रु .१,५०,००० / – जमा करता येतील .
● एका आर्थिक वर्षात कितीही वेळा रक्कम जमा करता येते .
● अनियमित खाते मात्र रुपये ५० / – चा भुर्दड भरून नियमित करता येईल .
● खात्यामध्ये रोख / चेक / डिमांड ड्राफद्वारा रक्कम जमा करता येईल . सध्याचा व्याजदर ७.४ %
● सरकारद्वारा अधिसूचित केलेले व्याज चक्रवाढ दराने खात्याला १५ वर्ष पूर्ण होईपर्यंत जमा केले जाईल .
● मुलीच्या वयाच्या १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी जमा रकमेच्या ५० टक्के रक्कम खात्यातून काढण्यास अनुमती .
● मुलगी दुसऱ्या गावात राहावयास गेल्यास खाते स्थलांतर करण्यास अनुमती .
● खाते उघडलेल्या तारखेपासून २१ वर्ष पूर्ण झाल्यास खाते परिपक्व होते . तत्पूर्वी लग्न झाल्यास मुदतपूर्व खाते बंद करण्यात येईल .
● खाते परिपक्व झाल्यानंतरदेखील बंद न केल्यास ते बंद होईपर्यंत नियमानुसार व्याज .
● खातेधारकाचा मृत्यू झाल्यास पालकांना व्याजासहित रक्कम मिळते .
● सेक्शन ८० सी अंतर्गत आयकरात सूट .
● मुदतीअंती मिळणारी पूर्ण रक्कम व्याजासहित करमुक्त आहे .
● व्याजदरात भारत सरकारच्या आदेशाप्रमाणे बदल होऊ शकतो .


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *