टाटा मोटर्सचा सामान्य कामगार मानद डॉक्टरेट पदवीने दिल्लीत सन्मानित

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०३ ऑगस्ट २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवड शहरातील नावाजलेल्या टाटा मोटर्स कंपनीत कामगार म्हणून काम करत असलेल्या सर्व सामान्य कुटुंबातील एक होतकरू तरुण जो कायम समाजातील प्रत्येक घटकातील दिनदुबळ्या,पिडीत, शोषित लोकांच्या सेवेसाठी दिवस-रात्र मेहनत करणारा गरजवंत शालेय विद्यार्थ्यांना,अंध अपंग मुकबधीरांना कायम मदत करणा-या अशा जनसेवेचा व्रत उचललेल्या श्रीराम अशोकसिंह परदेशी यांना वर्ल्ड हुमन राइट्स प्रोटेक्शन कमिशन मुख्य कार्यालय दिल्ली, बिजनेस पार्क प्रीतमपुरा या संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षापासून करत असलेल्या समाजसेवेसाठी समाज सेवेमध्येच मानद डॉक्टरेट या पदवीने दिल्लीत सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी प्रतिनिधीशी आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले की हा सन्मान फक्त माझ्या एकट्याचा नसून सन्मानाचे प्रमुख वाटेकरी माझे आई-वडील भाऊ बहीण तसेच माझी पत्नी व माझ्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत असलेल्या व्यक्ती या सन्मानास खरे पात्र आहेत. कारण गेले अनेक वर्ष समाजसेवेसाठी वाहून घेताना कुटुंबासाठीचा महत्वपूर्ण वेळ इतरांना दिला म्हणून हा सन्मान खरा माझ्या घरच्यांचाच आहे तसेच माझे सर्व मित्र परिवार यांच्यामुळेच हे चांगले कार्य माझ्याकडून झाले, अनेक प्रसंगांमध्ये माझा मित्रपरिवार माझ्यासोबत होता. प्रेरणादायी सर्व माझ्या मित्रांना व कुटुंबीयांना हा माझा सन्मान समर्पित करतो.

डॉ श्रीराम परदेशी हे राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहर चे सचिव म्हणून उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडत आहेत नोकरी बरोबरच कामगार कायद्याचे गाडे अभ्यासक असून लाॅ च्या शेवटच्या वर्षात बाहेरून शिक्षण ही घेत आहेत कामगारांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असल्याचे कामगार क्षेत्रात नेहमी बघायला मिळते.