बेकायदेशीर सावकारकी करणारा शिरूर पोलिसांच्या ताब्यात

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
०२ मार्च २०२२ 

शिरूर


शिरूर शहरातील हुडको वसाहतीत राहणारे किरण गजानन जंगम वय वर्ष 40 यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, शिरूर येथे बेकायदेशीरपणे करत असलेल्या सावकारा विरोधात शिरूर पोलीस स्टेशन व तालुका सहकार निबंधक कार्यालय यांच्या संयुक्त कारवाईत, एका सावकाराला बेकायदेशीर सावकारकी करत असल्याचे निष्पन्न झाल्याने अटक करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार किरण जंगम हे शिरूर येथील हुडको वसाहतीमध्ये राहत असून, त्यांनी दि. 25 फेब्रुवारी 2015 रोजी, शिरूर – बोऱ्हाडेमळा येथील सुभाष घावटे यांच्याकडून 1 लाख रुपये, 3% व्याजाने घेतलेले होते. त्या अनुषंगाने व्याज व मुद्दलेपोटी सुभाष घावटे यांनी किरण जंगम यांच्याकडून वेळोवेळी व आत्तापर्यंत सुमारे 3 लाख 39 हजार रुपये घेतले. होते परंतु दि. 6 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास, सुभाष घावटे यांनी तक्रारदार जंगम यांच्या घरासमोर येऊन, व्याजासाठी जंगम यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करत, त्यांच्याजवळील दिन तोळे वजनाची सोन्याची चैन व लिनोवो कंपनीचा k8 प्लस मॉडेलचा मोबाईल बळजबरीने घेतला. या संदर्भातील तक्रार किरण जंगम यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे दि. 27/02/2022 रोजी रीतसर तक्रार दिली असता, ही बाब सहकार खात्याशी संबंधित असल्याने, शिरूरचे सहाय्यक निबंधक एस एस कुंभार यांना बोलावून घेऊन, तक्रारदाराचे म्हणणे व त्या अनुषंगाने पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार, दोन्ही खात्यांच्या संयुक्त दप्तर तपासणीत, आरोपी घावटे हे दोषी आढळल्याने, शिरूर पोलीसांनी सुभाष घावटेविरोधात IPC 327 अंतर्गत महाराष्ट्र सावकारी नियमन व अधिनियम 2014 चे कलम 39 नुसार गुन्हा दाखल केलाय.

ही कारवाई पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या सूचनांनुसार व बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, गोपनीय अंमलदार राजेंद्र गोपाळे, पोलीस अंमलदार विनोद काळे, महिला पोलीस अंमलदार प्रतिभा नवले, चालक पोलीस हवालदार गणेश देशमाने यांनी केली.तसेच सहकार विभागामार्फत, जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांच्या सूचनेनुसार व तालुका सहाय्यक निबंधक एस एस कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली, जी डी पुंड, ए एच धायगुडे, पी बी पिसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.आरोपी सुभाष बळवंत घावटेला तात्काळ 24 तासांत अटक करत शिरूर कोर्टात हजर केले असता, त्यास दि 3 मार्च 2022 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालीय. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील करत आहेत.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही 5 फेब्रुवारी 2022 रोजी संतोष सुरेश काळे व सुरेश जगन्नाथ काळे, राहणार निमोणे, ता. शिरूर यांच्या विरोधात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये 88/22, भादवी कलम 406, 504, 506, 34 अंतर्गत महाराष्ट्र सावकारी नियमन 2014 चे कलम 39 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.त्याच पार्श्वभूमीवर शिरूर पोलिस स्टेशन कडून जनतेला आवाहन करण्यात येत आहे की, जर सुभाष बळवंत घावटे, रा. बोऱ्हाडेमळा, शिरूर, तसेच संतोष सुरेश काळे व सुरेश जगन्नाथ काळे, रा. निमोणे, ता. शिरूर, जी. पुणे यांनी जर आणखी कुणाला व्याजाने पैसे दिले असतील किंवा जास्त प्रमाणात व्याज मागून त्रास देत असतील, तसेच जर या व्यतिरिक्तही कुणी बेकायदेशीर सावकारकी करून कुणाची लूट करत असतील, तर अशा लोकांविरोधात पोलीसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *