दुतोंडी सेना म्हणून महाराष्ट्रातील जनता आपल्याला ओळखत आहे; गजानन काळे यांची शिवसेनेवर टीका


राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि मनसे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष भाजपाची बी टीम, असा आरोप शिवेसेनेने केला होता. त्याला मनसेच्या नेत्यांनी प्रत्युत्तरही दिलं आहे. आता दसरा मेळाव्यासाठी केलेल्या एका बॅनवरुन मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीची उपशाखा असलेल्या नवाबसेनेने शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी हिंदुत्वाची वज्रमुठ असे बॅनर प्रकाशित केलं आहेत. नवाबसेनेच्या नवाबप्रमुखांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची भाषणे, मुलाखती आणि पत्रकार परिषदा परत ऐकाव्यात. नसतील तर पाठवले जातील, असा टोमणा काळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. सत्तेत असताना हिंदुत्वाला बगल द्यायची. हिंदुत्व गुंडाळून ठेवायचं आणि काँग्रेस राष्ट्रवादीची लाचारी करायची. सत्ता गेल्यानंतर हिंदुत्वाची उपरडी नवाबसेनेला आली आहे. दुतोंडी सेना म्हणून महाराष्ट्रातील जनता आपल्याला ओळखत आहे, अशी टीकाही गजानन काळे यांनी शिवसेनेवर केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *