संभाजी विद्यालयाचा महेश गुंजाळ गुणवत्ता यादीत

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१५ जानेवारी २०२२

बेल्हे


पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संभाजी विद्यालय बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) या विद्यालयातील इयत्ता आठवी मधील विद्यार्थी महेश दत्तात्रय गुंजाळ हा शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादी मध्ये आला आहे. याबद्दल महेश दत्तात्रय गुंजाळ याचा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना पाचपुते त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्या अनघा घोडके तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षक यांनी सत्कार केला. त्याच्या यशाचे सर्वांनी कौतुक केले व पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *