भागेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२१ सप्टेंबर २०२२

नारायणगाव


वारूळवाडी नारायणगाव येथील भागेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक चेअरमन रमेशशेठ भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली. सभेचे अहवाल वाचन सचिव आत्माराम बनकर यांनी केले. सभेत सन २०२१-२२ सालाकरिता दुध उत्पादकांना २.५० रुपये प्रति लिटर बोनसची शिफारस केली होती परंतु संचालकांच्या मागणीनुसार ३ रुपये बोनस देण्याची घोषणा केली. याशिवाय इतरही महत्वपुर्ण ठराव या बैठकीत मांडण्यात आले.

संस्थेच्या वतीने दुध प्रक्रिया उद्योगाची उभारणी सन २०२२-२३ या चालू वर्षात करण्याचा निर्णय घेऊन दुध व्यवसायातील पुढचे पाऊल टाकण्याचे ठरविले आहे. दैनंदिन व्यवहारात पारदर्शकता , शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याबाबत सदैव कटिबद्ध राहण्याचे आश्वासन रमेशशेठ भुजबळ यांनी दिले. संस्थेच्या वतीने मागील काही काळापासून दुध उत्पादकांना जिल्हा दुध संघापेक्षा प्रति लिटर १ रुपयांची दरवाढ देण्यात येत असल्याने भागेश्वर दुध संस्थेच्या दुध उत्पादकांना जिल्हा दुध संघापेक्षा एकूण ४ रुपये जास्तीचा फायदा झाला आहे. सभासदांनी संस्थेच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले. सभेस संचालक व सभासद उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *