शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार – उद्धव ठाकरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ सप्टेंबर २०२२


मुंबईत शिवाजीपार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा होणार? यावरून राजकारण तापलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी शिवतीर्थावर होतो. पण या वर्षी एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर त्यांनीही दसरा मेळावा घेण्याचं नियोजन केलं आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी आता उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

शिवसेना भवनात आज उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीसंदर्भात आणि नेत्यांना महत्त्वाच्या सूचना करत आदेशही दिले. शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांनासोबत घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, मोठ्या प्रमाणात शिवतीर्थवर गर्दी जमवण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांना दिले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *