पिंपरी-चिंचवड येथे बंजारा समाजाचा मेळावा संपन्न

पिंपरी-चिंचवड
२० ऑक्टोबर २०२२


मंगळवार दि.18 ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड येथे बंजारा समाजाचा मेळावा गुलबर्गा कर्नाटक चे लोकसभा सदस्य बंजारा समाजाचे मार्गदर्शक खासदार डॉ. उमेश जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये पिंपरी चिंचवड येथे मेळावा संपन्न झाला.

गुलबर्गा कर्नाटक चे खासदार डाॅ.उमेश जाधव याचा बंजारा समाजाच्या वतीने सन्मान

खासदार डॉ.उमेश जाधव यांनी पिंपरी चिंचवड येथील बंजारा समाजाच्या समस्या जाणुन घेतल्या तसेच विविध समस्यांवर राज्य सरकार कडुन ठोस उपाय योजना करून देतो आणि पंतप्रधान मोदी यांच्या कडुन देश पातळीवर योग्य ती मदत बंजारा समाजाला मिळवुन दिली जाईल असे आश्वासन समाज बांधवाना दिले. यावेळी उपस्थित बंजारा शिक्षण अभियान चे समन्वयक सुर्यकांत राठोड बंजारा समाजाचे नितीन चव्हाण तसेच विजय राठोड बंजारा ब्रिगेड चे शहराध्यक्ष प्रताप राठोड दिलीप जाधव युवराज आडे उमेश राठोड रावसाहेब राठोड इरण्णा पाटील अण्णा पवार सतीष चव्हाण मलींगा राठोड लालसींग चव्हाण यांनी बंजारा समाजातील समस्या मांडल्या समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. रमेश राठोड यांनी सुत्रसंचलन केले. अतिशय उत्साहामध्ये चिंचवड येथे मेळावा पार पडला युवा उमेश राठोड यांनी सर्वांचे आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *