भूखंड वाटपाच्या निर्णयाला स्थगिती नाही – एकनाथ शिंदे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ सप्टेंबर २०२२

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने १ जून २०२२ नंतर वाटप केलेल्या भूखंडाच्या निर्णयास स्थगिती दिल्याचे ८ ऑगस्ट रोजी काढलेले पत्र आता पुढे आले असून अशा उद्योग विरोधी वातावरणात कोणता उद्योजक राज्यात गुंतवणूक करेल, असा सवाल आता विरोधी पक्षाकडून केला जात आहे. यातून सरकारवर टीका सुरू होताच भूखंड वाटपाच्या निर्णयाला स्थगिती नाही तर आढावा घेण्यासाठी तसे केले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या वतीने १ जून २०२२ नंतर वाटप केलेल्या भूखंडाचे सर्व प्रस्ताव नस्तीसह पुनर्विलोकन करण्यासाठी उद्योग विभागास सादर करावेत असे आदेश अवर सचिव किरण जाधव यांनी ८ ऑगस्ट रोजी काढले होते. माहिती सादर करताना औद्योगिक क्षेत्राचे नाव, अर्जदार कंपनीचे नाव, वाटप समिती, भूखंड वाटप समितीचा दिनांक, भूखंड मजूर केलेले क्षेत्र, त्याचा क्रमांक, ताबा दिनांक आदी माहिती मागविण्यात आली होती. मात्र, अशा प्रकारची कोणतीही स्थगिती दिली नाही. केवळ आढावा घेण्यासाठी ही प्रक्रिया केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *