पालिका भवनच्या प्रवेशद्वाराजवळ आठपुकलमने ओणम उत्सवास प्रारंभ 

आपला आवाज न्यूज नेटवर्क
 ०७ सप्टेंबर २०२२


पुण्यातील मल्याळी समुदाय कोविडचे महामारीमुळे आलेले संकट आणि दु:ख विसरून मोठ्या उत्साहात ओणम साजरा करीत आहेत. हा दहा दिवसांचा उत्सव अठपुकलमने या ओणम उत्सवाच्या  विधीने  सुरू झाला.  ओणम हा समृद्धीचा प्रतीक असणारा हा सण आहे.  याला केरळचा सुगीचा उत्सव म्हणूनही ओळखले जाते.

मल्याळी कल्चरल सोसायटी, चिखली अंतर्गत कलाक्षेत्रमच्या समुहाच्या कलाकारांनी तिरुवोणमच्या पूर्वसंध्येला गणेशोत्सवासह एकत्रित उत्सव साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनाच्या येथील प्रवेशद्वारावर 8 फूट व्यासाची फुलांची रांगोळी तयार केली.‌

यावेळी विधान परिषदच्या आमदार उमाताई खापरे‌, प्रवक्ता एकनाथ पवार ( भाजप महाराष्ट्र राज्य), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड चे प्रमुख महेश्वर मराठे, पिंपरी चिंचवड कामगार संघटनेचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे उपस्थित होते.‌ मनपाचे अधिकारी, नगरसेवक देखील  कार्यक्रमाचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.

मल्याळी कल्चरल सोसायटीचे  अध्यक्ष, के उन्नीकृष्णन, उपाध्यक्ष पी. फिलिप (सनी), सरचिटणीस, जयप्रकाश पिल्लई, कोषाध्यक्ष, व्ही सोमण,  कलाक्षेत्रम समन्वयक, के के अजित कुमार कार्यक्रमाचे नियोजन केले  होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्याळी कल्चरल सोसायटी महिला व युवा विभागाचे सदस्य, सर्व परिवारातील इतर सदस्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. प्रेक्षकांच्या डोळ्यांना आनंद देणारी ही कला पाहण्यासाठी पीसीएमसी परिसरातील अनेक लोकानी गर्दी केली होती.‌


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *