मंचर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी अन्न छत्रालय सुरू.

       आज रविवार दि.१६ मे पासून मंचरमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी अन्न छत्रालय सुरू करण्यात आल्याची माहिती मंचर चे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली
             आंबेगाव तालुक्यातील बहुतांश कोरोना चे रुग्ण मंचर मधील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल असताना रुग्णांच्या नातेवाईकांची मंचर शहर हे लॉकडाऊन असल्यामुळे नाष्टा तसेच जेवणाची गैरसोय होत आहे ही गोष्ट लक्षात घेऊन मंचर चे माजी सरपंच दत्ता गांजाळे, भाजपा चे संजयशेठ थोरात, सुजित देशमुख यांनी अन्न छत्रालयाची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेऊन आज रोजी १६ मे पासून अन्न छत्रालय चालू केले आहे.


         या अन्न छत्रालयाच्या उदघाटना ला राष्ट्रवादी काँग्रेस चे आंबेगाव तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, भाजपा आंबेगाव तालुकाध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे, भाजपा पुणेजिल्हा संपर्कप्रमुख जयसिंगशेठ एरंडे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजयशेठ थोरात,भाजपा संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, माजी सरपंच अश्विनी शेटे, ग्रामपंचयात सदस्य अरुण बाणखेले,वसंत बाणखेले, उद्योजक गोविंदशेठ खिलारी,  व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना बाळासाहेब बाणखेले यांनी आंबेगाव तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या २८८ बेडच्या जम्बो कोविड सेंटर बद्दल माहिती देताना राज्याचे गृहमंत्री तालुक्याचे नामदार श्री.दिलीपराव वळसे पाटील यांचे आभार मानून सदर उपक्रमाचे कौतुक केले तसेच भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे यांनी या उपक्रमास शुभेच्छा देऊन आवश्यक ती मदत देणार असल्याचे सांगितले.
       ” या अन्न छत्रालयाचा लाभ कोविड रुग्णांचे नातेवाईक तसेच मंचर उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना होईल ” असे मत भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष संजयशेठ थोरात यांनी व्यक्त केले.