विद्यार्थ्यांनी साधला लेखिकेशी संवाद

रोहित खर्गे
विभागीय संपादक 
२९ जानेवारी २०२२

वडगाव आनंद


बालसंस्कार समुह महाराष्ट्र राज्य व जि.प.प्रा.शाळा पादीरवाडी व जि. प . शाळा वडगाव आनंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लेखक आपल्या भेटीला या उपक्रमात इ. चौथीच्या भाषा पाठ्यपुस्तकातील ‘मिठाचा शोध ‘या पाठाच्या लेखिका अंजली अत्रे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी सुदाम साळुंके यांनी प्रास्ताविकात अंजली अत्रे यांचा परिचय करुन दिला. त्यानंतर अंजली अत्रे यांनी मिठाचा शोध या पाठाचा परिचय गोष्टीरुपाने विद्यार्थ्यांसमोर मांडला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.शिक्षकांनीही आपली मनोगते व्यक्त केली.


विद्यार्थ्यांना मौलिक कानमंत्र देताना त्या म्हणाल्या कि तुम्ही रोजच्या रोज घडणार्‍या गोष्टी लिहून ठेवत जा.त्यामुळे तुम्हाला लिखाणाची आवड निर्माण होईल. अंजली अत्रे या लेखिकेबरोबरच उत्कृष्ट अभिनेत्री,उत्कृष्ट चित्रकार,एक पर्यावरणप्रेमी आणि एका मुलीला घडविणारी उत्कृष्ट आई असल्याचे यावेळी जाणवले.त्यांनी सांगितलेली भेळीची गोष्ट तर सर्वांनाच खूप भावली. या उपक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी,शिक्षक ,पालक सहभागी झाले होते. केंद्रप्रमुख मा. मंगल डुंबरे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अंजलीताई अत्रे , साळुंके सर, नवनाथ सुर्यवंशी , वर्गशिक्षिका कल्पना फापाळे, संगीता कुदळे तसेच सर्व शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती वडगाव आनंद व पादीरवाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी संगिता कुदळे यांनी आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *