झी मराठी वाहिनीवरील होम मिनिस्टर कार्यक्रमाचे श्री क्षेत्र ओझर येथे झाले चित्रीकरण

मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी
२७ ऑगस्ट २०२२

ओझर


नुकतेच अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेले श्री क्षेत्र ओझर येथे झी मराठी वाहिनीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे चित्रकरण झाले. भाद्रपद गणेश चतुर्थी निम्मित गणेश जन्मोत्सव सोहळा दिनांक ३१/०८/२०२२ रोजी होणार असल्याने श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री गणेश कवडे व विश्वस्त मंडळ यांनी सदर कार्यक्रम श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी होत असताना ट्रस्ट च्या नावलौकिका मध्ये भर पडणार असल्याचे सांगितले.

झी मराठी वाहिनीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुख्यतः सदर चित्रीकरण करतेवेळी श्री आदेश बांदेकर साहेब यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रथमता. देवस्थान ट्रस्ट च्या हेलिकॉप्टर द्वारे अष्टविनायक दर्शन या सुविधे बाबत बांदेकर साहेबांनी ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त यांचे विशेष कौतुक केले .हि संकल्पना भरपूर लोकांच्या डोक्यात असेल परुंतु आमलात आणणारी संस्था हि श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट आहे ,असे देखील ते म्हणाले.या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कार्यक्रम करताना श्री विघ्नहाराच्या मंदिरातील मुख्य पुजारी हेरंब जोशी,चिंतामण जोशी,भालचंद्र जोशी,जयेश जोशी,मंगेश जोशी आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले पुजारी विघ्नराजेंद्र जोशी यांचा सामावेश कार्यक्रमात केला होता.या कार्यक्रमासाठी देवस्थान ट्रस्ट ने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने बांदेकर साहेबांनी विशेष आभार मानले. श्री विघ्नहरास अभिषेक करून दर्शन घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

देवस्थान ट्रस्ट च्या भक्तभवन क्र.३ या भक्तनिवास मध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या प्रसंगी गावच्या सरपंच सौ.मथुरा कवडे,व इतर माहिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.देवस्थान ट्रस्ट च्या वतीने आदेश बांदेकर यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार करतेवेळी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे,विश्वस्त आनंदराव मांडे,रंगनाथ रवळे,माजी सरपंच जगन्नाथ कवडे यांची उपस्थिती होती.देवस्थान ट्रस्ट राबवत असलेल्या विविध विकासकामांची माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली. ट्रस्ट करत असलेल्या कामाचे विशेष कौतुक आदेश बांदेकर यांनी केले .त्याच बरोबर डायलेसिस युनिट चालविण्यासाठी विशेष असे सहकार्य सिद्धीविनायक देवस्थान ट्रस्ट मार्फत करणार असल्याचे आदेश बांदेकर यांनी सांगितले.मुख्यते करून हा कार्यक्रम श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी आयोजित केल्या बद्दल ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे यांनी बांदेकर साहेब व झी मराठी वाहिनीचे आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *