कुमशेत ग्रामस्थांच्या विशेष प्रयत्नामुळे प्रलंबित २ वर्षे रखडलेल्या अष्टविनायक रोडच्या कामाला आली गती

ओझर प्रतिनिधी: मंगेश शेळके

दि.३ ऑगस्ट २०२१ (ओझर) :* जुन्नर तालुका अखत्यारीत कुमशेत गावातील अष्टविनायक रोडचे काम जवळजवळ दोन वर्षे पूर्णतः बंद होते .गावकऱ्यांच्या या रोडच्या संदर्भात अनेक मागण्या अभावी हे काम बंद करण्यात आले होते. परंतु कुमशेत गावचे सरपंच , उपसरपंच व ग्रामस्थांनी या रोडच्या संदर्भात वेळोवेळी वरती पाठपुरावा केल्यामुळे व आमदार अतुल बेनके व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आज या ठिकाणी हे रोडचे काम येत्या दोन -चार दिवसांत चालू करण्यात येणार आहे. अष्टविनायक रोडचे मुख्य अधिकारी युवराज पाटील साहेब यांनी ग्रामस्थां समवेत येथील रोडचा पूर्णता पुन्हा सर्वे करून व ग्रामस्थांच्या मागणीनुसार नवीन रोडची मोजमापे घेऊन हे काम येत्या दोन दिवसात चालू करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणीही जाणून घेण्यात आल्या. यामध्ये ग्रामस्थांच्या आग्रहाखातर रस्त्याच्या डांबरीकरणाची रुंदी साडे पाच मीटर वरून सात मीटर करण्यात आली . तसेच तीनवाट ते दत्त मंदिर व स्मशानभूमी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पिण्याच्या पाण्याची यूपीव्हीसी पाईप लाईन करून देणे , रस्त्याच्या दोन्ही बाजूला योग्य अंतरावर गटर काढून देणे ,महावितरणचे एन.टी.लाईन पोल वस्तीच्या दोन्ही बाजूला स्थलांतरित करणे इत्यादी अशा अनेक गावकऱ्यांच्या मागण्या यावेळी मान्य करण्यात आल्या.व हे काम येत्या 2-4 दिवसात चालू होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

या रोडची पाहणी करताना डॉ. अमोल कोल्हे यांचे स्वीय सहाय्यक तुषार डोके , गावचे सरपंच रवींद्र डोके ,उपसरपंच सुनंदाताई दुधवडे, अष्टविनायक रोडचे पदाधिकारी युवराज पाटील साहेब, सुभाष डोके साहेब,राष्ट्रवादी संजय गांधी योजनेचे अध्यक्ष जुन्नर तालुका अरुण शेठ पारखे ,राष्ट्रवादीचे कुमशेत अध्यक्ष जालिंदर डोके ,सुधीर डोके ,निलेश डोके, शंकर भगत, नितीन भगत, वैभव डोके ,विशाल डोके ,प्रभाकर नाना डोके ,भरत डोके, वल्लभ डोके, सरपंच उल्काताई मोरे ,उपसरपंच विश्वास जाधव माजी सरपंच अरुण मोरे ,महावितरण समिती सदस्य बाळासाहेब मोरे ,पत्रकार राजेश डोके ,आपला आवाजचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके ,राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी, गावचे सर्व ग्रामस्थ ,तरुण वर्ग व पत्रकार बंधू यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *